लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड खरेदी विक्री संघावर वर्चस्व कायम राखले आहे. त्यांचे समर्थकांची सभापती, उपसभापती म्हणून निवड झाली आहे.

गेल्या ४० वर्षापासून अनिल देशमुख यांच्या ताब्यात असलेल्या नरखेड खरेदी विक्री संघामध्ये अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी सर्व पक्षांनी ही निवडणुक एकत्र लढविली होती. परंतु यात अनिल देशमुखांनी ११ पैकी ८ जागेवर दणदणीत विजय मिळविला तर एक जागा ईश्वर चिठीत गेली.

आणखी वाचा-अमरावती : ‘आरटीओ’च्या ३० सेवा झाल्या ‘फेसलेस’! प्रत्‍यक्षात कार्यालयात येण्‍याची गरज नाही

शुक्रवारी झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे लिलाधर ठाकरे हे सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओम खत्री हे उपसभापती पदी निवडून आले.

मागील महिन्यात झालेल्या नरखेड खरेदी विक्रीच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी भाजपासह इतर सर्वच विरोध पक्ष व राष्ट्रवादीचा एक फुटीर गट एकत्र आले होते. परंतु तरी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजय झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukhs supporters narkhed buying and selling association chairman and deputy chairman rbt 74 mrj