अमरावती : प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात न येता ऑनलाइन पद्धतीने घरूनच इंटरनेटच्या मदतीने आता ३० सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आधार कार्डला मोबाइल क्रमांक जोडलेला असणे अत्यावश्यक आहे, त्याशिवाय फेसलेस पद्धतीचा लाभ घेता येणार नाही. ऑनलाइन पद्धतीने प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या संकेतस्‍थळावर ‘फेसलेस’ हा पर्याय निवडल्‍यानंतर आधार क्रमांक टाकून वाहनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

या प्रक्रियेनुसार अर्जदार नोंदणी पुस्तिकेत पत्‍ता बदल, दुय्यम नोंदणी पुस्तिका देणे, खरेदी करार रद्द करणे, दुय्यम फिटनेस, ना- हरकत प्रमाणपत्र, वाहनांचे विवरण पत्र, मालकी हस्तांतरण करणे, परवाना हस्तांतरण, परवाना हस्तांतरण (परवानाधारकांच्या मृत्यूनंतर), परवाना रद्द करणे, दुय्यम परवाना देणे, तात्पुरता परवाना, विशेष परवाना, परवाना जमा करणे, परवाना कायमस्वरूपी जमा करणे, परवाना नूतनीकरण, शिकाऊ अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलणे, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करणे, अनुज्ञप्तीत बदल करणे, अनुज्ञप्तीचे दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती देणे, करणे, अनुज्ञप्तीवरील वा विवरणपत्र, अनुज्ञप्तीवरील एखादे दुय्यम अनुज्ञप्ती देणे, बायोमेट्रिकमध्ये बदल करणे, वाहक अ लायसन रद्द करणे, वाहक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, माल परवाना नूतनीकरण इत्‍यादी कामे करता येणार आहेत.

All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Maratha Reservation Refusal to grant urgent interim injunction to anti-reservation petitioners
मराठा आरक्षण : आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना तातडीचा अंतरिम आदेश देण्यास नकार

हेही वाचा – “मां जिजाऊ” या नावाशी शासनास आकस आहे का? शिवप्रेमींचा सवाल; शिल्प लावण्यास विलंब म्हणून करणार आमरण उपोषण

नागरिकांनी घ्यावा सेवेचा लाभ

आरटीओच्या ३० सेवा अमरावती कार्यालयातही ‘फेसलेस’ करण्यात आलेल्या आहेत. या सेवेचा लाभ घेतल्यास संबंधित कामांसाठी कार्यालयात येऊन वेळ खर्ची करावा लागणार नाही. अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. -राजाभाऊ गित्ते, प्रादेशिक परिवाहन अधिकारी, अमरावती.