लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या नावे असलेल्या कारने नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. ही गाडी संकेत बावनकुळे यांच्या नावाने असल्याचे माहिती स्वतः बावनकुळेंनी दिली आहे. हे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून विरोध पक्षाने सरकारवर टीका केली आहे. सरकार, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा त्यांचा आरोप आहे.

मात्र भाजप नेते पुत्राचा हा पहिलाच कारनामा नाही. यापूर्वी भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या सुपुत्रावर बारमध्ये भांडणाचे प्रकरण प्रचंड गाजले होते. २०१६ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात खुनचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो गुन्हा मागे घेण्यात आला होता.

आणखी वाचा-आकस्मिक निधीत सहकार्याची मागणी भ्रष्टाचार नव्हे…कोर्टाच्या एका निर्णयाने लाचखोरीच्या आरोपीला…

या प्रकरणात आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांना अंबाझरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करावे लागले होते. अभिलाष खोपडे आणि रोहित खोपडे यांनी क्लाऊड सेव्हन बारमध्ये तोडफोड केल्याचा आणि बारमालाकच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. २० नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांचा वाद झाला होता. त्यात अभिलाषवर बारची तोडफोड केल्याचा आरोप होता. यात शुभम महाकाळकरची हत्या झाली होती. बारमध्ये धुडगूस घातल्या प्रकरणी कलम ३०७ अन्वये अभिलाष खोपडे, रोहित खोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या कारचे प्रकरण गाजत आहे. नागपुरात आलिशान ऑडी गाडीने दुचाकीला धडक दिली आहे. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन बावनकुळेंनी केले आहे. या मुद्यांवरून विरोधी पक्षाने राज्य सरकारवर आरोप केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र, या अपघातानंतर अनेक गंभीर प्रश्न केलेउपस्थित केले आहेत. अपघातावेळी भरधाव आलिशान ऑडी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते, असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

आणखी वाचा-भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांवर रॅश ड्रयव्हिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना, हा अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

सुषमा अंधारेंचा आरोप

नागपुरात ज्या भरधाव ऑडीने दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, या गाडीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा होता, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argument in bar in 2016 bjp mla krishna khopdes son had surrendered rbt 74 mrj