नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहे. मात्र, परीक्षेच्या तारखा घोषित न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती. यानंतर आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १३ जूनपासून विविध परीक्षांना सुरुवात होणार आहे.

अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून, नव्याने घोषित झालेली भरतीही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही उमेदवारांच्या वतीने करण्यात आली होती. ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी हाती येतील त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून चार महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार? या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता.

हेही वाचा : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प: पैसे भरा आणि मगच मचाणवर बसा, पण जेवण मिळणार नाही !

ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. ही परीक्षा लवकर घ्यावी. मात्र, उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली होती. यातच आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : शासनाच्या डोळ्यात धुळफेक! शेती नसलेल्यांनाही मिळाले धानाच्या बोनसचे पैसे; ६ लाख रुपयांचा घोटाळा

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक

आरोग्य सेवक पुरुष- १०,११ आणि १२ जून – ९ पाळ्यांमध्ये
आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी- १३,१४,१५ जून – ८ पाळ्यांमध्ये
सहाय्यक परिचारिका – १६ जून- २ पाळ्यांमध्ये
ग्रामसेवक – १६,१८,१९,२०,२१ जून- १२ पाळ्यांमध्ये

हेही वाचा : नागपूर, वर्धेत स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवणे सुरू; ग्राहकांच्या मनस्तापाचे…

असा आहे जिल्हा परिषद भरतीचा प्रवास

मागील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद पद भरती होणार होती. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन पद भरती शेवटी रद्द करावी लागली. मध्यंतरी राज्य सरकारने जिल्हा परिषदेची पद भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील ८७५ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तर परिक्षेची जबाबदारी आयपीबीपीएस कंपनीला दिली होती. या जाहिरातीनंतर उमेदवारांकडून पाठपुरावा एकूण ८८ हजार ७५३ उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरतीला स्थगिती आली. तर उर्वरीत पदांची परीक्षा जवळपास आटोपल्या होत्या. यात ९ संवर्गातील पदाचा निकाल लागला असून, त्यातील २२ वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती सुद्धा झाली आहे. आता पेसा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना परीक्षेची तारीख जाहिर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात होती. सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली जात होती. अशाचत आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १३ जूनपासून विविध परीक्षांना सुरुवात होणार आहे.