Premium

सुधारित वेतनश्रेणी देण्यास कंपनीकडून टाळाटाळ, कामगारांचे ‘बॉयलर’वर चढून आंदोलन

न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे.

company reluctant revised pay scale, protest climbing boiler Ferro Alloy plant chandrapur
सुधारित वेतनश्रेणी देण्यास कंपनीकडून टाळाटाळ, कामगारांचे ‘बॉयलर’वर चढून आंदोलन (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

चंद्रपूर: येथील मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमधील मागील २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत स्थायी कर्मचाऱ्यांना औद्योगिक एस १ ग्रेड वेतन लागू करण्याचे न्यायालयाने आदेश दिले असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही सुधारित वेतन लागू केले नाही. त्यामुळे एस-१ वेतनश्रेणी लागू व्हावी, यासाठी सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांनी कामगारांसह फेरो अलॉय प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थायी कामगारांना एस-१ ग्रेड वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी कामगारांनी लढा उभारला होता. न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे. मात्र, फेरो अलॉय प्लांट व्यवस्थापन कामगारांना सुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सीएफपी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात सहसचिव माणिक सोयाम, कोषाध्यक्ष महादेव चिकटे, संघटक हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चौहान यांनी प्लांटच्या बॉयलरवर चढून आंदोलन सुरू केले.

हेही वाचा… मनोरंजनाची केवळ एक वस्तू आठ किलोंनी वाढवते तुमचे वजन…

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. आंदोलनाची बाब कंपनी प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: As the company is reluctant to give the revised pay scale the protest has been started by climbing on the boiler of the ferro alloy plant in chandrapur rsj 74 dvr

First published on: 02-12-2023 at 18:47 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा