Nagpur Farmers Protest : कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी कालपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात रोखून धरलेल्या शेतकऱ्यांशी ,पर्यायाने आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बच्चू कडू व इतर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी राज्यशासनो आशीष जयस्वाल आणि पंकज भोयर या दोन राज्यमंत्र्यांना नागपूर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे दोन्ही मंत्री बुधवारी दुपारी चार वाजता नागपूर येथे येतील व आंदोलनस्थळी जाऊन कडू यांची भेट घेतील. विशेष म्हणजे जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत कडू यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांवर चर्चा झाली होती व त्यापैकी काही मागण्या सात दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय झाला होता. पण आत्ता ऑक्टोबर अखेर आहे पण त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही, असे कडू यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले होते व मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी व निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती.

पण शासनाने राज्यमंत्री चर्चेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्र्यांना तातडीने निर्णय घेण्याचे अधिकार आहे का ? की शासन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा आहे.

पोलिसांना मर्यादा

२८ ऑक्टोबरला बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपुरात धडकणार याची पोलिसांना कल्पना होती, सरासरी २५ ते ३० हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असा अंदाज पोलिसांना होता, त्यानुसार त्यांनी वर्धा मार्गावर शेतकऱ्यांना थांबता यावे म्हणून एक जागा निश्चित करून दिली होती. मात्र मंगळवारी दुपारी चार पर्यंत बच्चू कडू यांचा मोर्चा निर्धारित स्थळी आलाच नाही, त्यांनी त्यापूर्वीच पांझरा मार्गानजिक रस्त्यावरच ठिय्या मांडला, सुमारे पंचवीस हजार शेतकरी रस्त्यावर बसल्याने पहिल्या दिवशी नागपूरकडे येणारे व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रागा वर्धा मार्गावर लागल्या.

आंदोलनात शेतकरी तर सहभागी आहेच. याशिवाय अंध,अपंग, मूकबधीरही आहे. त्यांच्याही मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. काल म्हणजे मंगळवारी बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी मोर्चावर बळाचा वापर करताना थोडा विचार करावा, अंधाना दिसत नाही, बधिरांना पोलिसांनी दिलेल्या सूचना ऐकू येणार नाही अन् अपंगांना पळता येणार नाही, याचा विचार करूनच पोलिसांनी हस्तक्षेप करावा, असे कडू म्हणाले. सरकारची कोंडी करण्यासाठीच कडू यांनी शेतकऱ्यांसोबतच अंपंगाना सोबत घेतल्याचेच दिसून येेत