नागपूर : ‘काळे पैसे पांढरे’ करण्याच्या घटनेतून कोंढाळीतील फार्म हाऊसमध्ये दोन व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी बजरंग दलाच्या विदर्भाच्या सहसंयोजकासह इतर एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. हर्ष वर्मा (२२) रा. सोनबा नगर, दानेश शिवपेठ (२१) रा. जुना मानकापूर, लकी तुर्केल (२२) रा. मरियम नगर, ओंकार तलमले (२५) रा. स्मृती लेआउट, हर्ष बागडे (१९) रा. दत्तवाडी आणि विशाल पुंज (४१) रा. मोहन नगर, बडकस चौक असे अटक केलेल्या सर्व आरोपींची नावे आहेत. पुंज हे बजरंग दल विदर्भाचे सहसंयोजक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह प्रथम पेट्रोल टाकून जाळले. ते अर्धेच जळल्याने नंतर ते मृतदेह वर्धा नदीत फेकून दिले. नागपूर पोलिसांनी शिताफीने तपास केल्यावर ही घटना उघडकीस आली. या घटनेमागचा मुख्य सूत्रधार हा ओंकार तलमले आहे. तो सधन कुटुंबातील होता. परंतु विविध कारणांनी कर्जबाजारी झाला. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी त्याने इतर आरोपींच्या मदतीने पैसे दुप्पट करण्याची योजना आखली. पुंज हा तलमलेचा जवळचा मित्र असल्याने त्याने त्यालाही सोबत घेतले.

हेही वाचा >>> यवतमाळ : संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमस्थळी पुरोगामी कार्यकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात

आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांसोबत २.८० कोटी काळ्या पैशांचे दीड कोटी पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचा सौदा केला. आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांना चिटणवीस सेंटरमधील कॅफेमध्ये बोलावून बैठक घेतली. त्यानंतर ते व्यावसायिकांना चारचाकी वाहनातून कोंढाळी पोलीस ठाणे हद्दीतील रिंगणाबोडी गावातील फार्महाऊसवर घेऊन गेले व येथे दोन्ही व्यापाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केले.

आरोपीचा बजरंगदलाशी संबंध नाही

“विशाल पुंज याला दोन महिन्यांपूर्वीच बजरंगदलातून काढण्यात आले होते. त्यामुळे त्याचा बजरंग दलाशी काहीही संबंध नाही.”– विशाल अरखेल, प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang dal leader arrested in nagpur businessman murder case mnb 82 ysh