Premium

भाजपाने जाहीर केले लोकसभा निवडणूक प्रमुख, आमदार दटकेंकडे नागपूरची जबाबदारी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली आहे.

Lok Sabha election chief
भाजपाने जाहीर केले लोकसभा निवडणूक प्रमुख, आमदार दटकेंकडे नागपूरची जबाबदारी (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम/facebook)

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांची, तर रामटेकच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू

लोकसभा मतदारसंघासोबतच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात काटोल मतदारसंघासाठी चरणसिंग ठाकूर, साधनेरसाठी डॉ. राजीव पोतदार, हिंगणा नरेश चरडे, उमरेड – सुधीर पारवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी किशोर वानखेडे, दक्षिण मतदारसंघासाठी संजय ठाकरे, पूर्व नागपूर मतदारसंघासाठी प्रमोद पेंडके, मध्य नागपूर बंडू राऊत, पश्चिमसाठी संदीप जाधव, तर उत्तर नागपूर मतदारसंघात गिरीश व्यास, कामठी मतदारसंघात अजय बोढारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp announced lok sabha election chief mla datke in charge of nagpur vmb 67 ssb

First published on: 08-06-2023 at 16:08 IST
Next Story
मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात मात्र अजूनही घामाच्या धारा