काल मुंबई महाविकास आघाडीचा महामोर्चा झाला. यामध्ये शिवसेना उद्धव , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच इतर घटक पक्षही सामील झाले होते. मात्र या महामोर्चावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. महाआघाडीच्या हल्लाबोल्ल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री समोर आण्यासाठी होता की महाराष्ट्र हितासाठी होता असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.

महापुरुषांच्या बाबतीत होणारी टीका बघता महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी नितेश राणे यांनी अजित पवार व नाना पटोले यांच्यावर टीका करत दादा, नाना आता जागे व्हा, आपली महतवाकांक्षा ओळखा अशा शब्दात टीका केली आहे. या महामोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा: MVA Mahamorcha : मुंबईच्या रस्त्यांवर लोटला जनसागर! उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवारांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महामोर्चात सहभागी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विरोधात काल महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या मोर्च्यावरून भाजपा नेते राम कदम यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. तसेच भाजप , शिंदे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेने एकमॆनावर टीका करत होते.