नागपूर : भाजप- शिंदे गट युतीचे राज्यात ४५ खासदार निवडून आणू – बावनकुळे

बावनकुळे यांची शुक्रवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नागपूर : भाजप- शिंदे गट युतीचे राज्यात ४५ खासदार निवडून आणू – बावनकुळे
( भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे )

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदे गट युतीचे  ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणू,असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे व्यक्त केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही  युती कायम राहील,असे त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे यांची शुक्रवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी ते अमरावती दौऱ्यावर होते. तेथें त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू , असे सांगताना त्यांनी आगमी लोकसभा व त्यापूर्वी होणा-या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची पक्षाची भूमिका मांडली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
…अन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुलेटवर स्वार होऊन सर्वांना केले चकित
फोटो गॅलरी