नागपूर : श्वेता असोसिएशन ही कोड किंवा पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तींची आणि त्यांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहे. मागील २५ वर्षांपासून संख्या काम करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीरावर पांढरे असणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन, वधुवर मंडळ, नोकरी विषयक सहायता, डाग झाकोळणारी प्रसाधने उपलब्ध करून देणे, या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला प्रदर्शन आयोजित करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी फॅशन शो आयोजित करणे, यासह अनेक उपक्रम राबवले जातात.

वधुवर मंडळ आणि वधुवर मेळावे हा श्वेता असोसिएशनचा एक उपक्रम आहे. २००२ साली सुरू झालेल्या या वधुवर मंडळात २८०० -२९०० जणांची नोंदणी आहे. ही सेवा अतिशय माफक दरात ऑनलाईन उपलब्ध आहे. ज्यांना स्वतःला पांढरे डाग आहेत किंवा घरात आईवडील किंवा इतर नातेवाईकांना पांढरे डाग आहेत म्हणून लग्नाला अडचणी येत आहेत अशा मुलामुलींशी लग्न करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

नागपुरात पाचवा मेळावा

यावर्षीचा श्वेता असोसिएशनचा ६१ वा वधुवर मेळावा आहे आणि नागपुरातील ५ वा मेळावा आहे. विदर्भ , मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पुणे , मुंबई , नाशिक इत्यादी प्रभागातून लोक येतात. विदर्भातील अनेक मुलामुलींची श्वेता वधुवर मेळाव्यातून लग्नं जुळली आहेत. इच्छुक वधू – वरांनी मेळाव्या साठी येताना,आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत ,१ फुल साईझ फोटो बरोबर घेऊन यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष डॉ.माया तुळपुळे यांनी केले.
रविवार २ फेब्रुवारी रोजी, सेवा सदन शिक्षण संथेचे, विमलाबाई जटार सभागृह ,उत्तर अंबाझरी मार्ग, मेट्रो स्टेशन जवळ, झांशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजे पर्यंत हा वधू -वर परिचय मेळावा होईल. अधिक माहितीसाठी ८८८८८६५४८७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana haldi kumkum ceremony janefal transgender scm 61 ssb