बुलढाणा: , राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभरातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी पूर्वी घोषित केल्या प्रमाणे आज ८ ऑगस्ट पासून सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.
राज्य शासनाने या प्रकरणी एसआयटी स्थापन केली असून या समितीचा अहवाल येईपर्यंत कोणतेही कारवाई करू नये अशी मागणी आठ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. बुलढाण्यातील शिक्षण विभागातील अधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यापूर्वी १ एक ऑगस्ट रोजी राज्यभरातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने या प्रकरणातील अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले होते. त्यावेळी बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आठ ऑगस्ट पासून सामुहिक राजा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार राज्यभरातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही महिन्यापासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरण चर्चेत आहे या प्रकरणात काही अधिकार्यांना विना चौकशी अटक करण्यात आली असून संघटनेने याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की राजपत्रित अधिकारी म्हणून संबंधित अधिकारी प्रामाणिकपणे शासनाची कामे पार पाडत आहेत त्यांच्यावर काही दोष आढळल्यास नियमानुसार विभागीय चौकशीची तरतूद आहे. मात्र चोर सोडून संन्यासाला फाशी या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा कार्य करत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेच्या निवेदनात विना चौकशी अटके पासून संरक्षणाची लेखी आम्ही द्यावी यासाठी अहवाल येईपर्यंत शिक्षक शिक्षिकेच्या वेतन देयकावर सह्या करू नयेत तसेच सुट्टीच्या दिवशी लादण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व अधिकारी शिक्षणाधिकारी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले आहे. जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना आज शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनावर शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकार शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी एपी देवकर, वेतन पथक अधीक्षक निवालकार, प्रकाश कुळे यासाह इतर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शिक्षण विभागाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले आहे. येत्या काही दिवसांत याची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहे.