Premium

बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अहमदनगर येथील बंदद्वार व पत्रकारांना मज्जाव करण्यात आलेल्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल मुक्ताफळे उधळली. याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले.

Chandrashekhar Bawankule symbolic statue burn
बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : अहमदनगर येथील बंदद्वार व पत्रकारांना मज्जाव करण्यात आलेल्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल मुक्ताफळे उधळली. याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले. संग्रामपूर येथे पत्रकारांनी बावनकुळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत जळजळीत निषेध नोंदविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संग्रामपूर तहसील कार्यालयावर एकत्र येत भाऊ भोजने व रामेश्वर गायकी यांच्यासह पत्रकारांनी एकत्र येत पुतळा दहन केले. या आंदोलनात पावसाने व्यत्यय आणला असतानाही दहन करण्यात आले हे विशेष. यावेळी संग्रामपूर तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. जोपर्यंत भाजपा प्रदेशाध्यक्ष माफी मागत नाही तोपर्यंत भाजपाच्या बातम्या प्रकाशित करणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

हेही वाचा – “भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

हेही वाचा – ‘तिजोरी’ भरण्यासाठी वाट्टेल ते? कोतवाल व्हायचे तर पाचशे रुपये शुल्क, अर्जही फुकट नाही

आंदोलनात केशव घाटे, भाऊ भोजने, रामेश्वर गायकी, संजय महाजन, काशिनाथ मानकर, नारायण सावतकार, युसुफ शेख, मिर मकसुद अली, दयालसींग चव्हाण, सागर कापसे, संतोष आगलावे, गोपाल ईगळे, शेख रफीक, पंजाब ठाकरे, विवेक राऊत, अमोल ठाकरे, शेख मतीन, साबीर खान, शेख अब्दुल, सुनील मुकुंद, उदयभान दांडगे, रवी शिरस्कार, नंदू खानझोडे, सचिन पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule symbolic statue burn by journalists in buldhana scm 61 ssb

First published on: 26-09-2023 at 17:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा