चंद्रपूर : राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी या समाजात वळवळ करणाऱ्या किड्याला जेल मध्ये टाकून चक्की पिसिंग पिसिंग करायला लावणार, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वनहक्क जमीन घोटाळा; वनरक्षक, तलाठ्याचे निलंबन मागे, नव्याने चौकशी होणार

चिमूर येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तथा आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले देखील उपस्थित होते. काँग्रेस पक्ष तथा महात्मा गांधी व देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या नेत्यांबद्दल भिडे अतिशय खालच्या पातळीवर बोलून तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. या भिडे ऊर्फ समाजात लागलेल्या किड्याला जेलात चक्की पीसिंग पिसिग करायला लावणारं आहे. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर हे आम्ही नक्की करू, असेही वडेट्टीवार म्हणाले.

blob:https://www.loksatta.com/aa135262-2830-4be1-a717-6f771a87bf4d
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader vijay wadettiwar says sambhaji bhide will be in jail if congress forms government rsj 74 css