काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेसने गुरुवारी नागपुरातील ईडी कार्यालयासमोर निदर्शने केली. संतप्त काँग्रेस नेत्यांनी ईडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रातील भाजप सरकार महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांवर दडपशाही करीत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना याच कारणावरून ईडीने नोटीस पाठवली. त्याचा निषेध करण्यासाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयापुढे आंदोलन केले. यावेळी आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, गिरीश पांडव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protests in front of ed office amy