congress spokesperson dilip edatkar reaction over saint gadge baba dashasutri removed from mantralay zws 70 | Loksatta

खोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का? – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल

दशसूत्री हटवणे हा गाडगे बाबांच्या विचाराचा घोर अवमान असून ती विनाविलंब जशीच्या तशी लावण्यात यावी, अशी मागणी ॲड. एडतकर यांनी केली आहे

खोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का? – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल
काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर

अमरावती : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर  लावण्यात आलेली गाडगेबाबांची दशसूत्री काल-परवा शिंदे सरकारने काढून टाकली. सत्‍तेतील भुकेलेल्यांना खोके आणि उघड्या-नागड्यांना राजवस्त्रे मिळालीत म्हणून या दशसुत्रीचा उद्देशच संपुष्टात आला, असा समज यामागे आहे का, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. दशसूत्री हटवणे हा गाडगे बाबांच्या विचाराचा घोर अवमान असून ती विनाविलंब जशीच्या तशी लावण्यात यावी, अशी मागणी ॲड. एडतकर यांनी केली आहे

नागपूर अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फलकात संत गाडगेबाबा यांची दशसूत्री कोरण्यात आली होती, त्याचे समारंभपूर्वक अनावरणही झाले होते. गेले दोन अडीच वर्ष मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ही दशसूत्री सर्वांनाच प्रेरणा देणारी ठरली होती, तथापि काल-परवा शिंदे सरकारने दशसूत्रीचा फलक काढून टाकला.

 ‘दशसूत्री’ऐवजी ‘दहशतसूत्री’ लादण्याचा प्रयत्न

संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची कर्मभूमी अमरावती असून अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्‍यांनी तातडीने या बाबीची दखल घ्‍यावी. शिंदे सरकार गाडगेबाबांची दशसूत्री हटवते ही अत्यंत निषेधार्ह बाब असून हे सरकार दशसूत्रीऐवजी ‘दहशतसूत्री’ लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप एडतकर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
यवतमाळमध्ये मजुरांच्या वाहनाला अपघात ; एक ठार, दोन जण गंभीर

संबंधित बातम्या

नागपूर: खाकी वर्दीतील दाम्पत्याच्या दुभंगलेल्या मनात खाकी वर्दीनेच पेरला आनंद
नागपूर: मोतीबिंदू शस्रक्रिया, काय म्हणाले फडणवीस
नागपूर रेल्वे स्थानकात मुख्य प्रवेशद्वार बंद, तिकीट खिडकी हलवली ! पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे प्रवासी वेठीस
‘सीबीआय’कडून रिझव्‍‌र्ह बँकेची चौकशी
रानटी हत्ती पहायला जाणे पडले महागात ; खड्ड्यात पडल्याने पायाचे हाड मोडले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ – देवेंद्र फडणवीस
Jaydev Unadkat Tweet: ११ महिन्यानंतर उनाडकटचे ‘हे’ ट्विट होत आहे व्हायरल; जाणून घ्या कारण
पुणे: गोवरची साथ नियंत्रणासाठी चौथीपर्यंतच्या वर्गांना सुटी द्या; छावा मराठा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शहरी नक्षलवाद प्रकरण : हानी बाबू यांची अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी याचिका
‘माझी स्पर्धक मीच’ – अभिनेत्री संयमी खेर