चंद्रपूर: बुधवारी सायंकाळ पासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर ह्या ठिकाणी भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याबाबत व ३.२ रिश्टर चे भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप अँप द्वारे प्राप्त झाली, त्याच वेळी वरोरा परिसरातील नागरिक विशेषतः मार्दा, एकोना गावातील नागरिक , पोलीस पाटील , तलाठी त्यांच्यामार्फत खात्री केली असता कोणत्याही प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले.तसेच सदरील परिसरात वेकोली खदान व्यवस्थापनाकडून ही खात्री केलेली आहे,

सदरील नोंद झालेल्या भूकंपाच्या घटनेत सध्या तरी कोणतेही नुकसान न झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून प्राप्त देण्यात आली आहे.या जिल्ह्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवरात्री महोत्सवावर पावसाने पाणी फेरले आहे. अशातच वरोरा तालुक्यात काही दिवसांपूर्वी ढगफुटी सारखा पाऊस झाला होता. त्याच वरोरा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे.