लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर: राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत १७ सप्टेंबरला निघणाऱ्या महामोर्चात कुणबी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आहे. धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी चंद्रपूर येथे नुकतेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने ओबीसी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी व्यक्त केले. या महापंचायतीत ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वसतिगृह तत्काळ सुरू करावे व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सहभागी करू नये, असे ठराव मांडण्यात आले.

यासंदर्भात महापंचायतीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली असून १७ सप्टेंबरला प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाचा महामोर्चा विविध मागण्यांसाठी काढून रोष व्यक्त केला जाणार आहे.

आणखी वाचा-“नितीन गडकरी श्रद्धाळू, पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला त्यांचा पाठिंबा” प्रा. श्याम मानव यांचे प्रतिपादन; म्हणाले…

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण देऊ नये, अशी भूमिका कुणबी समाजातून व्यक्त केली जात आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे त्यांना ओबीसीमध्ये आणणे होय. त्यामुळे हा समाज ओबीसींचे आरक्षण मिळविणार व ओबीसी हक्कांपासून वंचित होतील, असे मत धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर चंद्रपूर येथील अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी व्यक्त केले.

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये. बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, या निर्णयाविरुद्ध कुणबी समाजात अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे १७ सप्टेंबरला गांधी चौक येथून निघणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधवांनी उपस्थित राहून आपल्या न्याय हक्काची पूर्तता करावी, असे आवाहन अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entire kunbi community will take to the streets on september 17 against maratha reservation rsj 74 mrj