चंद्रपूर : राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत असताना आता राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. स्वतः वडेट्टीवार यांनी फेसबुक पेजवर आनंदाची बातमी विरोधी पक्षनेता होणार, अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर राज्यात भाजपा – शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. तर काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे.

हेही वाचा – गुजरातमधील दोषी व्यक्ती ‘माफसू’च्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत! कुणाचा आहे दबाव….

विरोधी पक्ष नेता कुणाला करायचे यावर दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे मंथन सुरू आहे. काँग्रेस नेत्यांच्या याच बैठकीतून आमदार वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वतः वडेट्टीवार यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी आनंदाची बातमी, आपले लाडके नेते, ओबीसींचे कैवारी, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार माननीय विजय वडेट्टीवार यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता! ही पोस्ट केली आहे. राजकीय वर्तुळात या पोस्टची आता चर्चा सुरू झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex minister vijay wadettiwar as leader of opposition in the state a post on the facebook page is discussed rsj 74 ssb