लोकसत्ता टीम

बुलढाणा: दमदार पावसाची आतुर प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. घाटाखालील ४ तालुक्यात व १९ महसुल मंडळाला अतिवृष्टीचा फटका बसला.

आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या गत २४ तासात जिल्ह्यात एकूण ६३६ मिमी व सरासरी ४९ मिमि पावसाची नोंद झाली. शेगाव ९१मिमी, जळगाव ८४, संग्रामपूर ७६ व मलकापूर ७५ मिमी या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. घाटाखालीलच मोताळा ३०मिमी, नांदुरा ५६ मिमी या तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. केवळ खामगाव मध्ये २९ मिमी पावसाने हजेरी लावली.

आणखी वाचा-गडचिरोली: पुरातून चारचाकी काढण्याचा प्रयत्न अंगलट, दोन अभियांत्यासह तिघे थोडक्यात बचावले,पाहा व्हिडिओ…

या तुलनेत घाटावरील सहा तालुक्यातील पावसाची आकडेवारी व तीव्रता कमी आहे. बुलढाणा २४ मिमी, चिखली २८, देऊळगाव राजा २९, सिंदखेड राजा ३२, लोणार ४१, मेहकर ३८ मिमी इतका पाऊस झाला आहे.