नागपूर: नागपूरसह देशभरात सोन्याचे वाढणारे दर ग्राहकांची चिंता वाढवत आहे. परंतु मागील सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच सराफा व्यवसायिकांनी सोन्याच्या दराबाबत मोठे भाकित केले आहे.त्यामुळे ग्राहकांमध्ये सोन्याच्या दराबाबत उत्सूकता आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या. नागपूरसह देशभरात करोनाचा प्रभाव ओसरल्यापासून सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे. बघता बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (३ मार्च २०२५ रोजी) नागपुरात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे.नागपुरातील सराफा बाजारात आठवड्याभरापूर्वी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये नोंदवले गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, नागपुरात आठवडयाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (३ मार्च २०२५ रोजी) सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८५ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. हे दर २१ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे राज्यात २५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या तुलनेत ३ मार्च २०२५ रोजी नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ९०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान सोन्याचे दर आंतरष्ट्रीय घडामोडी बघता येत्या दिवसात आणखी वाढण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सोन्याच्या धातीत गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

चांदीच्या दरातही आपटी

नागपुरातील सराफा बाजारात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ४०० रुपये होते. हे दर दुसऱ्या सात दिवसांनी (३ मार्च २०२५ रोजी) ९४ हजार ४०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. त्यामुळे चांदीच्या दरात तब्बल २ हजार रुपये प्रति किलोची घट झालेली दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fall in gold prices mnb 82 amy