लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लग्नसराईचे दिवस सुरू असतानाच सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु आता काही दिवसांपासून सातत्याने सोन्याचे दर घसरत आहे. आता मंगळवारी (८ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु चांदीच्या दराने मात्र ग्राहकांमध्ये चिंता वाढवली आहे.

करोनानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढत होते. बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले. लग्नसराईत दागिने खरेदीचा बेत असलेल्यांमध्ये हे दर बघून चिंता व्यक्त होत होती. दरवाढीमुळे ग्राहक पूर्वीच्या तुलनेत कमी वजनाचे दागिने घेवून वेळ काढत होते. परंतु आता दर की होऊ लागल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजार १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये होते.

दरम्यान हे दर सोमवारी कमी झाले होते. त्यामुळे सोमवारी (७ एप्रिल २०२५) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ८८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. हे दर दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता (८ एप्रिल २०२५ रोजी) २४ कॅरेटसाठी ८८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ७ एप्रिलच्या तुलनेत ८ एप्रिलला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी २०० रुपये घसरल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरातही मात्र उलट स्थिती…

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर १ एप्रिल २०२५ रोजी चांदीचे दर दर प्रति किलो १ लाख १ हजार ४०० रुपये होते. हे दर सोमवारी ७ एप्रिल २०२५ रोजी सराफ बाजार उघडल्यावर प्रति किलो ८९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. तर मंगळवारी (८ एप्रिल २०२५ रोजी) हे दर प्रति किलो ९० हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ७ एप्रिलच्या तुलनेत ८ एप्रिलला दर प्रति किलो ८०० रुपयांनी वाढलेले दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fall in gold prices on 8 april 2025 in nagpur mnb 82 mrj