नागपूर: विदर्भातील सर्वाधिक मिठाई विक्रेते- उत्पादक नागपूरात आहेत. एप्रिल- २०२२ ते आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उत्पादनाच्या तपासण्या केल्या. त्यापैकी ४२ अस्थापनांनी मिठाईच्या डब्यांवर उत्पादन व ते मुदतबाह्य कधी होणार याची तारीख टाकली नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणासुदीत मोठया प्रमाणात दुध, खोवा, मिठाईची विक्री होते. हे पदार्थ नागरिकांना दर्जेदार मिळायला हवे. त्यासाठी एफडीएकडून उत्पादक- विक्रेत्यांची तपासणी केली जाते. एप्रिल- २०२२ ते २० सप्टेंबर २०२३ पर्यंत एफडीएने नागपूर जिल्हयातील मिठाई विक्रेते, उत्पादक, रेस्टॉरेन्ट ईत्यादी व्यवसायिकांच्या तपासण्या केल्या. त्यात ४२ प्रतिष्ठानातील मिठाईवर उत्पादन व मुदतबाह्य तिथी नसल्याने या व्यवसायिकांवर कारवाई केली.त्यांच्याकडून२ लाख ७९ हजार रुपये दंड वसूल केला.

हेही वाचा >>>चंद्रपूर : सरकारने महापूर व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने, केवळ १७ हजार रुपये मिळणार

या काळात जिल्ह्यात नमकीन, खोवा, बर्फी, कलाकंद बर्फी, मोदक, रसगुल्ला, पेढा, काजुकतली, लाडु, बुंदी, गुलाबजामुन, श्रीखंड, ऑईल, वनस्पती व कोकोनट पावडरचे १२९ नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठवले. त्यापैकी १०१ नमुने प्रमाणित तर १२ नमुने मानकाप्रमाणे नव्हते. यापैकी तीन व्यावसायिकांवर खटले दाखल करण्यात आले तर उर्वरितांकडून १ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला, असे एफडीए कडून कळवण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food and drug administration inspections of the product have found that candy containers do not list the product expiration date in nagpur mnb 82 amy