बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या वाहनाला भरधाव एसटी बसने धडक दिली. यामुळे त्यांच्यासह सुमारे सहाजण जखमी झाले. एअर बॅग लगेच उघडल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. अकोला ते अमरावती दरम्यान आज दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींवर अकोला येथे उपचार सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचा निच्चांकी दर किती? पहा एका क्लिकवर…
हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून बच्चू कडूंचे विशेष अभिनंदन; नेमकं काय घडलं, वाचा…
या घटनेचा विस्तृत तपशील कळू शकला नाही. मात्र प्राप्त माहितीनुसार, शिंदे यांनी अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर खासदार अनिल बोंडे यांच्या भेटीसाठी अमरावतीकडे निघाले. अकोला सीमेवर कारंजा येथून अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली.
First published on: 07-10-2023 at 14:19 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla of buldhana assembly constituency vijayraj shinde vehicle was hit by an st bus scm 61 ssb