नागपूरः नागपूरसह देशभरात मध्यंतरी सोन्याच्या दरात वाढ होऊन ते २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २०० रुपयापर्यंतच्या उंचीवर पोहचले होते. परंतु गेल्या सात दिवसांत सातत्याने सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे. २० मे २०२४ रोजीच्या तुलनेत नागपुरात २७ मे २०२४ रोजी सोन्याचे दर तब्बल २ हजार ८०० रुपयांनी कमी झाले आहे.

नागपूरसह राज्यभरात सध्या लग्न समारंभाची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसते. या समारंभात वर- वधूला सोन्याचे दागिने घेतले जातात. त्यामुळे हल्ली नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे गर्दी वाढली आहे. दरम्यान सोन्याचे २० मे २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंतच्या विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु आता हे दर घसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्‍के; राज्यात पाचवे स्‍थान

नागपुरातील सराफा बाजारात २७ मे २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार ४००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९० हजार १०० रुपये होते. हे दर २० मे २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ७०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात २० मे २०२४ या दिवसाच्या तुलनेत २७ मे २०२४ यादिवशी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ८०० रुपयांनी घसरले. तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल १ हजार ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे दागिने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : चिंताजनक : ४ महिन्यांत १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; मृत्यूनंतरही कुटुंबीयांचा मदतीसाठी संघर्ष

सोने खरेदीची चांगली संधी

नागपुरातील सराफा व्यवसायिकांच्या माहितीनुसार, सध्या सोन्याचे दर कमी झाली असले तरी आंतराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता सोने- चांदिचे दर लवकरच पून्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या धातूचे दागिने खरेदीची चांगली संधी आहे. जर खरेदीला विलंब केल्यास दास्त दहाने ते खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे.