नागपूर : परिवहन खात्याने राज्यभरातील ‘आरटीओ’ कार्यालयांच्या माध्यमातून १६ हजार शासकीय व खासगी कार्यालयांना मोटार वाहन कायदा ‘१९४- ड’ अंतर्गत नोटीस बजावली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्याने हेल्मेट न घातल्यास संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांवर कारवाई होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सेव्ह लाईफ या संस्थेच्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील एकूण अपघाती मृत्यूंपैकी ५५ टक्के मृत्यू हे दुचाकीवरील अपघाताने झाले आहेत. दगावलेल्यांपैकी अनेकांनी हेल्मेट घातले नव्हते. या सगळ्यांनी हेल्मेट घातले असले तर ९० टक्के मृत्यू टळले असले. हेल्मेटचे महत्व बघता परिवहन खात्याने राज्यभरातील आरटीओ कार्यालयांच्या माध्यमातून शासकीय व खासगी अशा १६ हजार कार्यालयांना मोटार वाहन कायदा ‘१९४- ड’ अंतर्गत नोटीस बजावली आहे.

हेही वाचा – गडचिरोली : वनहक्क जमीन घोटाळ्याप्रकरणी भूमाफिया आणि अधिकाऱ्यांना अभय, लहान कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड?

कार्यालयातील कर्मचारी विना हेल्मेट येत असल्यास कार्यालय प्रमुखांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आरटीओचे अधिकारी संबंधित कार्यालयात प्रत्येक आठवड्यात सीसीटीव्ही कॅमेरे तपासून विना हेल्मेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

१८ हजार दुचाकी चालकांवर कारवाई

परिवहन खात्याने नोटीस बजावल्यावरही विना हेल्मेट कार्यालयात येणाऱ्या राज्यभऱ्यातील १८ हजार दुचाकी चालकांवर परिवहन खात्याने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत ८८ लाखांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली.

हेही वाचा – मला मुख्यमंत्री बनवायला निघाले की फटाके बांधायला? आमदार वडेट्टीवार व धानोरकर यांच्या भर सभेत एकमेकांना कोपरखळ्या

“हेल्मेट सक्तीद्वारे अपघाती मृत्यू कमी करणे शक्य आहे. त्यासाठी राज्यातील १६ हजार शासकीय व खासगी कार्यालयांना मोटार वाहन कायदा ‘१९४- ड’ अंतर्गत नोटीस बजावली आहे. कर्मचारी विना हेल्मेट येत असल्यास तेथील कार्यालय प्रमुखांवर कारवाई केली जाऊ शकते. या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक आठवड्यात तपासून विना हेल्मेट येणाऱ्यांवरही कारवाई करू.” – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Head of office responsible if employees do not wear helmet notice from transport department to 16 thousand offices mnb 82 ssb