अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात ३० ऑगस्‍ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ३१ ऑगस्‍ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मूर्तिजापूर रेल्‍वे स्‍थानकानजीक लांब पल्‍ल्‍याच्‍या लूप मार्गासाठी वाहतूक आणि पॉवर ब्‍लॉक घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे आठ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. यापूर्वी १४ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍याची माहिती रेल्‍वे प्रशासनाकडून देण्‍यात आली होती, त्‍यापैकी सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॉवर ब्‍लॉकमुळे ०११२७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-बल्‍लारशाह विशेष एक्‍स्‍प्रेस (२९ ऑगस्‍ट), ०११२८ बल्‍लारशाह- लोकमान्‍य टिळक टर्मिनस विशेष एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२१ भुसावळ-वर्धा एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२२ वर्धा-भुसावळ एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), २२११७ पुणे-अमरावती एसी एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-पुणे एसी एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), ०१३६५ भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर (३१ ऑगस्‍ट) आणि बडनेरा-भुसावळ (३१ ऑगस्‍ट) या रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षेत नेमके बदल काय? कुठल्या भाषा विषयांची सक्ती असणार? जाणून घ्या एका क्लिकवर…

हेही वाचा – अमरावती : मद्यधुंद अवस्‍थेत स्‍वत:चेच घर जाळले, आरोपीला दोन वर्षांचा तुरुंगवास

यापूर्वी रद्द घोषित करण्‍यात आलेल्‍या सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत, त्‍यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १२१३६ नागपूर-पुणे एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), पुणे-नागपूर एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), १७६४१ काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट) आणि १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेसचा (३० ऑगस्‍ट) समावेश आहे. काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस अकोलापर्यंत धावणार आहे, तर नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेस अकोला येथून सुटणार आहे, अशी माहिती मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाकडून देण्‍यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important for rail passengers 8 trains canceled due to power block mma 73 ssb