बुलढाणा: मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली असून एक लाखावर ग्रामस्थांना याची झळ पोहोचत आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा माहौल असल्याने पाणी टंचाईची समस्या आणि ग्रामस्थांचे होणारे बेहाल याकडे लक्ष द्यायला नेतेमंडळींना सवड नाही. मार्चच्या पूर्वार्धातच टँकरची संख्या दुहेरी झाली आहे. सध्या ४ तालुक्यातील १३ गावांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठयावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव चिलमखा, सुरा,चिखली मधील हातनी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, बुलढाणा मधील वरवंड, पिंपरखेड, या गावांतील एकूण ३५ ,३४६ गावकऱ्यांचे बेहाल होत आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा तोकडा पडत असल्याने गावकरी प्रामुख्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

हेही वाचा : गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासींची हेळसांड केव्हा थांबणार ? बालिका अत्याचारप्रकरणी ढिसाळ आरोग्य व्यवस्था पुन्हा चर्चेत

दुसरीकडे ७ तालुक्यांतील ६४ गावांची तहान अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यासाठी ८१ विहिरी अधिग्रहित करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ गावांना तब्बल ३१ विहिरीद्वारे पुरवठा होत आहे. चिखलीत १४ गावांना १९ तर मेहकर तालुक्यातील १९ गावांना १९ विहिरीद्वारे पुरवठा करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana district water crisis at 77 villages scm 61 css