बुलढाणा : निर्धारित मुदतीत अंमलबजावणी केली नाही तर नजीकच्या काळात बुलढाणा शहर परिसरातील ‘त्या’ दुकानांच्या पाट्या मनसेच्या खास पद्धतीने खाली उतरविण्याचा इशारा बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठी पाट्या लावण्यासंदर्भात २५ सप्टेंबरला दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जल्लोषाचे वातावरण आहे. याचा बुलढाणा तालुक्यातही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.
हेही वाचा : चंद्रपूर : श्रीगणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ईरई धरणातून अतिरिक्त पाणी
हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे अमोल रिंढे पाटील यांनी येथे बोलताना सांगितले. न्या. बी. वी. नागरत्ना आणि न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे स्वागत करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana mns gives warning to shops and establishments who have name boards in language other than marathi says boards will be removed mns style scm 61 css