नागपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर महायुतीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासह बीड आणि परभणी घटनेवर भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. सरपंचाची हत्या होणे हे कुठेही सहन केले जाणार नाही. या प्रकरणात काही लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. काहींना निलंबित करून घरी पाठवलेले आहे. आतापर्यंत तीन आरोपींना पकडले असून अजून काही आरोपी या प्रकरणात लवकरच सापडतील. विशेष तपास करून या संदर्भात सगळी चौकशी आम्ही करणार आहोत. आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. अशा घटना महाराष्ट्रामध्ये गांभीर्याने घेतल्या जातात आणि गांभीर्याने घेतल्या जातील. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सगळे धागे दोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “होय आमचे सरकार ईव्हीएमचे, कारण…”

खरं म्हणजे तीन-चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. त्या विषयावर सविस्तर उत्तर हे सभागृहांमध्ये आम्ही निश्चितपणे देऊ. मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे, आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षाने चर्चा करावी, कुठेही त्यांचा आवाज दाबला जाणार नाही. आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाहीत. फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडियासमोर बोलायचं हे मात्र योग्य नाही. हे लोकशाही विरोधी आहे. सभागृहात बोलायचं नाही आणि मीडियासमोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देतो असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषता विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करू एवढाच विश्वास यानिमित्ताने मी देतो आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहांमध्ये करावी असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : कमी संख्याबळाचा वारंवार उल्लेख, विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न

परभणीच्या घटनेवर फडणवीस थेटच म्हणाले

आम्ही पोलिसांना सांगितलेला आहे की आकस बुद्धीने कारवाई करू नका. कोंबिंग ऑपरेशन वगैरे करू नका, पण जे लोक कॅमेरामध्ये लाट्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसतात, दगड मारताना दिसताय, त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे. मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचे उत्तर या निवडणुकीने दिलेले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur cm devendra fadnavis strict action against vandalizers of beed parbhani violence incident dag 87 css