नागपूर : तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक ५.६७ किमी लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल ०५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ०५ ऑक्टोबरला एलआयसी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही आहेत पुलाची वौशिष्ट्य

या पुलाची लांबी ५.६७ किमी असून तो त्रीस्तरीय आहे. वरती मेट्रो धावणार आहे. सर्वाधिक लांबीचा हा डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिलरवर उभा असून स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण आहे. या प्रकल्पाची किंमत ५७३ कोटी आहे. यासोबतच तंत्रज्ञानाचा अतुलनीय वापर करून उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहेत. या उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग आहे, दुसऱ्या स्तरावर मेट्रो धावत आहे आणि जमिन पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे.

हेही वाचा : अमरावती: शिक्षिकांचा अभाव, अल्‍पवयीन मुलींच्या समुपदेशनात अडथळे

१६५० टनाचा स्टील पूल

गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ १६५० टन वजन क्षमतेचा स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे. देशातील ही पहिली रचना आहे, ज्यामध्ये चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. उड्डाणपुलाच्या संरचनेत ‘रिब अॅन्ड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या उड्डाणपूलाचे बांधकाम अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड होते. विशेषत: गड्डीगोदाम येथे असलेला भूमिगत मार्गातील वाहतूक आणि रेल्वे मार्गावर सतत रहदारी असल्यामुळे भारतीय रेल्वेकडून एकूण २४ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.

पुलाचा फायदा काय?

या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कामठीहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्याने त्याची वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे. वर्धा आणि कामठी या दोन्ही बहुस्तरीय मार्गाची बेरीज केली तर महामेट्रोने सुमारे ९ किमीचा डबल डेकर उड्डाणपूल बांधला आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीत जागावाटपाचे चित्र अस्पष्ट, ‘अकोला पूर्व’वरून पेच; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

शहरातील दुसरा पुल

एलआयसी चौक ते आटोमोटिव्ह चौक या दरम्यान बांधण्यात आलेला डबल डेकर उड्डाण पूल हा अशा प्रकारचा नागपुरातील दुसरा उड्डाण पूल आहे. यापूर्वी वर्धा मार्गावरील अजनी चौक ते विमानतळ चौक या दरम्यान डबल डेकर पुल बांधण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur double decker flyover inauguration by central minister nitin gadkari on 5th october cwb 76 css