नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आमदाराच्या थांबण्याची सोय असलेल्या आमदार निवासात दुपारी १० ते १५ मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथे उपस्थितांकडून आश्चर्य व्यक्त केले गेले. नागपुरातील आमदार निवासाच्या द्वारापर्यंत महावितरण वीज पुरवठा करते. अंतर्गत वीज पुरवठ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) विद्युत विभागाची असते. मंगळवारी दुपारी ३.३५ ते ३.५० दरम्यान येथे पंधरा मिनिट वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी येथे खोलीचा ताबा घेण्यासाठी काही आमदारांचे स्वीय सहाय्यकांसह काही अधिकारीही उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाचीच वीज खंडित झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत महावितरणच्या एका अधिकाऱ्याला विचारना केली असता त्यांनी आमचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला. तर पीडब्लूडीच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी इतर भागातून वीज पुरवठा वळवण्यासाठी काही मिनटे वीज पुरवठा खंडित केला, असे सांगितले परंतु अधिवेशनापूर्वी तब्बल १५ मिनीट वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील देखभाल व दुरूस्तीच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहे. दरम्यान पीडब्लूडीच्या अधिकाऱ्याने येथे जनरेटरची सोय केली असल्याचा दावा करत येथे सहसा वीज पुरवठा खंडित होत नसल्याचेही सांगितले.

हेही वाचा : ‘शासन आपल्या दारी’ ही तर सरकारची फसवेगिरी… जयंत पाटील यांचा आरोप

आमदार निवास परिसर चकाचक

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्याने आमदार निवासातील सर्व इमारतीसह खोल्यांमध्ये रंगरंगोटी करण्यात आली आहे. तर येथील स्वागत कक्ष, प्रतीक्षालय आणि इतरही भागाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. मंगळवारी आमदार निवासाला भेट दिली असता संपूर्ण परिसर चकाचक असल्याचे दिसून आले. गुरूवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे.

हेही वाचा : काँग्रेसची ईव्हीएमवर शंका, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “लोकांच्या मनातील संशय…”

तळमाल्यावरील खोल्यांच्या गॅलरीला लोखंडी कठडे

आमदार निवासातील तळमजल्यावर प्रत्येक खोलीला लागून एक गॅलरी आहे. या गॅलरी पूर्वी उघड्या होत्या. त्यामुळे गॅलरीचा दार उघडा राहिला आणि येथील व्यक्तीचे लक्ष नसल्यास चोरीचाही धोका होता. परंतु आता या गॅलरीला पूर्णपने लोखंडी ग्रीलचे कठडे लावण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरून कुणालाही खोलीत जाणे शक्य नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur electricity supply in the residence of mlas interrupted before winter session of assembly mnb 82 css