नागपूर : अवघ्या ५०० रुपयांसाठी तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला. प्रभाकर सूर्यभान मेश्राम ( वय ५४) असे आरोपीचे नाव असून तो सिद्धार्थनगर, टेका येथील रहिवासी आहे. सदर घटना पाचपावली येथील आहे. मृताचे नाव विक्की ऊर्फ विठ्ठल सिद्धार्थ बागडे होते. तो सिद्धार्थनगरातच राहत होता. आरोपीने विक्कीला ५०० रुपये उधार दिले होते. विक्कीने ते पैसे परत केले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ मे २०२० रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपीने नेहमीप्रमाणे विक्कीला पैसे परत मागितले. विक्कीने त्याला सध्या पैसे नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे आरोपीने चिडून विक्कीवर चाकूने हल्ला केला. शरीराच्या विविध भागांवर अनेक वार करून त्याची हत्या केली.

हेही वाचा…अकोला पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि ठाकरे गट लढण्यावर ठाम

पोलिस उपनिरीक्षक एम. ए. गोडबोले यांनी प्रकरणाचा तपास केला.त्याला पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्याकरिता दोन वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षाही सुनावली गेली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. लीलाधर शेंदरे यांनी बाजू मांडली. त्यांनी १० साक्षीदारांसह विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur man sentenced to life imprisonment for murder of youth over rs 500 debt tpd 96 psg