नागपूर : मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर ती वारंवार पैशाची मागणी करीत होती. त्यामुळे कंटाळलेल्या युवकाने महिलेचा गळा आवळून खून केला. मित्राच्या मदतीने मृतदेह कन्हान नदीत फेकला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्याकांडाचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली. सुनील उसरबर्से (२२) आणि त्याचा मित्र आर्यन महतो (२०) दोन्ही रा. कपिल नगर अशी आरोपींची नावे आहेत. शीतल उकरे (४२) असे मृतक महिलेचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी सुनील उसरबर्से आणि मित्र आर्यन महतो हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून मागील चार वर्षांपासून ते जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दत राहतात. सुनील अविवाहित असून १४ वर्षांच्या लहान भावासोबत राहतो. सुनील साफसफाईचे काम करतो. मिळकत भक्कम आणि खर्च कमी असल्याने सुनीलकडे चांगली रक्कम असायची. शीतल ही टाईल्सच्या दुकानात काम करायची. तिला पती आणि दोन मुली आहेत. पती एका खासगी कंपनीत काम करतो. लहान मुलगी ११वीला तर मोठी मुलगी बीए प्रथम वर्षाला शिकते. शितलचा पती आणि सुनील चांगले मित्र आहेत. शीतल काम करीत असलेल्या दुकानात सुनील अधून मधून् साफाईसाठी जात होता. त्यामुळे दोघांचीही चांगली ओळख होती. तसेच पती सोबत मैत्री असल्याने घरी ये-जा होती. यातूनच त्यांच्यात अनैतिक संबध निर्माण झाले. पती कामावर गेल्यानंतर दोघांचीही घरी भेट होती.

हेही वाचा : पेपर फुटीच्या संशयावरून आंदोलन; पीएच.डी. अधिछात्रवृत्ती चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सीलबंद नसल्याचा आरोप

२८ डिसेंबर पासून शितल बेपत्ता होती. कुटुंबियांनी जरीपटका ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद केली. पोलीस शोध घेत होते. शीतलच्या पतीची विचारपूस झाली. मात्र, त्याचा सुनीवर अजीबात संशय नव्हता. परंतू, पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही आणि यातूनच हत्याकांडाचा छडा लागला.

अशी घडली घटना

शीतल वारंवार सुनीलला पैसै मागत होती. आतापर्यंत सुनीलने ६५ हजार रुपये तिला दिले होते. त्यानंतर तिने पु्हा १० हजार रुपयांची मागणी केली. सुनीलने तिला नकार दिला. मात्र, तिने दमदाटी करीत पैशाची व्यवस्था करण्यास सांगितले. २८ डिसेंबरला सुनीलने तिला घरी पैसे देण्यासाठी बोलाविले. शीतल रात्री त्याच्या घरी गेली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. सुनीलने तिचा गळा आवळला. ती निपचित पडली. मात्र, मृत्यू झाल्याची खात्री नसल्याने त्याने तिचा गळा चिरून हत्या केली.

हेही वाचा : रेल्वेमार्गाचे मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द; श्रेयासाठी वाद झाल्याने निर्णय

मृतदेह फेकला नदीत

शीतलच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. त्याने मित्र आर्यनला बोलाविले. कबुतर उडाले अशी थाप मारली. आर्यन घरी येताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्यास नकार दिला. परंतू सुनीलने ‘मदत केली नाही तर तूच हा खून केल्याचे पोलिसांना सांगेल,’ अशी भीती घातली. त्यामुळे आर्यन तयार झाला. दोघांनी शीतलाचा मृतदेह एका पोत्यात टाकला. दुचाकीवरून पारशीवनीच्या दिशेने निघाले. मृतदेह कन्हान नदीत पुलावरून फेकून विल्हेवाट लावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur murder of friend s wife due to illicit relationship body disposed through sack adk 83 css