वर्धा : आर्वी तालुक्यातील पिपरी पारगोठान येथील एका मुलीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. हे चारही आरोपी लगतच्या धनोडी बहाद्दूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे मागोवा घेतला जात असल्याचे आर्वी पोलीसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नवरात्रोत्सवाच्या उंबरठ्यावर सोन्याचे दर ६० हजारांवर, आजचे दर पहा…

मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. घटनेचा तपशील अद्याप मिळालेला नाही. दरम्यान आदिवासी नेते अवचितराव सयाम यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करीत आरोपींना त्वरित अटक करीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha girl gang raped by 4 men in pipri pargothan of arvi pmd 64 css