यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय मतिमंद युवतीवर एका २६ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या मुलीच्या नातेवाईकांना आठ तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर काही पत्रकारांनी जाब विचारल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तालुक्यातील एका नराधम तरूणाने मतिमंद असलेल्या आणि आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलीला जीवानिशी मारण्याची धमकी देत सतत लैंगिक शोषण केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. या तरूणीस डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही. शिवाय ती मतिमंद असल्याने तिचे लग्न झालेले नाही. अत्याचारग्रस्त मुलीने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. २६ सप्टेंबर रोजी पीडित तरूणी आपली बहीण, आत्या, भाऊ आणि अन्य नातेवाईकांसोबत तक्रार दाखल करण्यासाठी दिग्रस पोलीस ठाण्यात आली. मात्र त्यांना आठ तास ताटकळत बसविण्यात आले.

हेही वाचा : चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्या ४७५ शाळांना लागणार टाळे?

या प्रकरणात स्थानिक पत्रकांरांनी हस्तक्षेप केल्यानंतर तरूणीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमोल दामोधर चव्हाण (२६) याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. ही घटना उजेडात आल्यानंतर दिग्रस शहरात रोष व्यक्त होत असून पीडित मतिमंद तरूणीस न्याय देण्याची मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal 25 year old mentally retarded girl raped digras police denied to registered complaint nrp 78 css