लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा तुमच्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन नियमांमध्ये काही बदल केले आहेत. ते रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत आहेत.

रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. प्रवाशांना झोपेचा त्रास होऊ नये आणि प्रवासादरम्यान त्यांना शांत झोप लागावी यासाठी रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

हेही वाचा… राजकीय हस्तक्षेपामुळे सार्वत्रिक बदल्यांना मुदतवाढ? राज्य पोलीस दलात खदखद

अनेकदा प्रवासी तक्रार करतात की, त्यांच्या कोचमध्ये एकतर प्रवास करणारे लोक फोनवर मोठ्याने बोलतात किंवा रात्री उशिरापर्यंत गाणी ऐकतात. रेल्वे एस्कॉर्ट किंवा मेंटेनन्स कर्मचारीही मोठ्याने बोलतात, याशिवाय अनेक प्रवासी रात्री १० नंतरही दिवे सुरू ठेवतात. त्यामुळे त्यांची झोप उडते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने नवा नियम केला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रवाशाने नियमांचे पालन केले नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान रात्री १० नंतर जर तुम्ही मोबाईलवर जलद बोलत असाल तर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. नवीन नियमांनुसार, रात्रीच्या प्रवासात प्रवासी मोठ्याने बोलू शकत नाहीत आणि संगीत ऐकू शकत नाहीत. कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडवण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची असेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways has made some changes in the rules keeping in mind the convenience of the passengers cwb 76 dvr