नागपूर: उपराजधानीत डेंग्यू सदृष्य आजाराचे थैमान असतांनाच आता दुषित पाण्यामुळे झालेल्या दोन कावीळच्या रूग्णांची नोंद झाली. या रुग्णांवर डागा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर शहरात गेल्यावर्षी दुषित पाण्यामुळे होणाऱ्या ए आणि ई संवर्गातील एकही कावीळचा रुग्ण आढळला नव्हता. परंतु यंदा येथील नेहरू नगर झोनमध्ये दोन दहा वर्षांच्या आतील भावांना कावीळची लागन झाल्याचे पुढे आले. दोघांना कावीळची गंभीर लक्षणे असल्याने डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल केले गेले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्यात कावीळचे निदान झाले. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाला ही माहिती कळताच तातडीने संबंधित रुग्णाच्या घर परिसरातील निरीक्षणासह रुग्णाशी संबंधित माहिती घेऊन उपाय सुरू केले गेले.

हेही वाचा… कुपोषणाचा विळखा घट्ट ! गोंदिया जिल्ह्यात १,५९९ अतितीव्र कुपोषित बालके; पोषण आहारावर लाखोंचा खर्च, मात्र…

नागपूर महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे म्हणाले, यापैकी एका रुग्णाची रुग्णालयातून सुट्टी झाली असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहे. दुसऱ्याचीही प्रकृती स्थिर आहे. कावीळचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यानुसार, पाणी उकळून गार केलेले पाणी प्यावे (पाण्याला उकळी फुटल्यानंतर ते कमीत कमी १० मिनिटे उकळू घ्यावे), वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, फळे व पालेभाज्या स्वच्छ धुवुन घ्याव्या, उघडयावरील अन्नपदार्थ खाऊ नये, नीट शिजलेले व गरम अन्न खावे, तयार अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे.

हेही वाचा… वर्धा: गाडी दिली नाही म्हणून चक्क बापानेच तोडला मुलाचा लचका

त्यावर माश्या बसणार नाहीत यांची काळजी घ्यावी. दरम्यान कुणाला पिवळे डोळे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, ताप, उलटी, पोटात उजव्या बाजूस दूखणे ही लक्षणे दिसताच तातडीने शासकीय, महापालिका रुग्णालय अथवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावा. ही कावीळची लक्षणे असल्याचेही डॉ. नवखरे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaundice risk increased in nagpur mnb 82 dvr