बुलढाणा: भरधाव दुचाकीच्या धडकेने रस्ता  ओलांडत असलेला बिबट्या  गंभीर जखमी  झाला आहे.  दरम्यान  आज त्याला उपचारासाठी जेरबंद करण्यासाठी गेलेल्या बचाव पथकातील वन कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. या बिबट्याला उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले तर कर्मचाऱ्याला बुलढाणा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जिवंत महिलेला तलाठ्याने दाखवले मृत; महसूल विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर!

 १७ जून रोजी सायंकाळी  बुलढाणा – खामगाव मार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यातील जुना देव्हारी फाट्या जवळ हा खळबळजनक घटनाक्रम घडला. खामगाव येथील दोन युवक केटीएम बाईकने खामगावच्या दिशेने भरधाव वेगात जात होते.याच वेळी ज्ञानगंगा अभयारण्यात रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला त्यांनी जोरदार धडक दिली. यात बिबट्या गंभीर जखमी झाला तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडली व दोन्ही युवक देखील जखमी झाले . घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ‘आरएफओ’ चेतन राठोड, वनपाल संजय राठोड व इतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बिबट्या जखमी अवस्थेत दिसून आला तर केटीएम बाईक पडून होती. 

हेही वाचा >>> ऑलिव्ह रिडले कासवाचा १२०० किलोमीटरचा प्रवास

दुचाकी चालक त्या ठिकाणाहुन निघून गेले होते. जखमी बिबट्याला पकडून उपचार करण्यासाठी बुलडाणा वनविभागाची रेस्क्यू टीम व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलविण्यात आले. मात्र  बिबट्या आक्रमक होता व  रात्री अंधार ‘रेस्क्यू’ करणे अशक्य होते. यामुळे  आज १८ जून रोजी  जखमी बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने बिबट्याला उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा झु मध्ये रवाना करण्यात आले . बिबट्याला धडक मारून जखमी करणाऱ्या दुचाकी चालका विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती  आरएफओ चेतन राठोड यांनी दिली. जखमी बिबट्याने हल्ला चढविल्याने  प्रमोद रामदास राठोड (वय ४० वर्ष रा.डोंगरखंडाळा ,  ता बुलढाणा)हा कर्मचारी जखमी झाला  . त्याला अगोदर त्जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard seriously injured while crossing road hit by speeding bike scm 61 zws