नागपूर : कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन संचाबाबत सोमवारी जनसुनावणी झाली. यावेळी बहुसंख्य स्थानिक नागरिकांसह १३ ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला समर्थन दिले. परंतु पर्यावरणवादी, काँग्रेस, आप, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मात्र प्रकल्पाला विरोध केला.
नागपूरजवळील कोराडीत ६६० मेगावॅटचे २ संच कार्यान्वित करण्याचे महानिर्मितीकडून प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबाबत सोमवारी महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्प परिसरात सुनावणी झाली. सुनावणीत अपवाद सोडले तर बहुसंख्य नागरिकांनी रोजगार मिळणार असल्याचे सांगत प्रकल्पाला समर्थन जाहीर केले. या काँग्रेस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला यापूर्वी एफजीडी लावण्यासोबतच प्रदूषणाबाबत दिलेले एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नसल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनीही पूर्वीचे प्रदूषण नियंत्रित झाल्यावरच नवीन प्रकल्पाला समर्थनाची भूमिका घेतली. शिवसेनाच्या उद्धव ठाकरे
हेही वाचा >>> नागपूर : एमडी तस्करीची भीती दाखवून डॉक्टरची ३ लाखांनी फसवणूक; गुन्हा दाखल
भाजप नेत्याकडून पारशिवनीत प्रकल्पाची मागणी
भाजपचे माजी आमदार व नेते मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले, शहराला लागून असलेला हा प्रकल्प प्रदूषणाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तो पारशिवनीत उभारण्याची मागणी त्यांनी केली. कोराडीतील या प्रकल्पामुळे बऱ्याच गावात कोळसा वाहतुकीमुळे ध्वनी, वायू प्रदूषणाची गंभीर समस्या असल्याचा दाखला त्यांनी दिला.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Locals support proposed power plant in koradi opposition from environmentalists mnb 82 ysh