बुलढाणा: रविवारी रात्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे ३३ हजार ९५१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदुरा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ६७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याखालोखाल सिंदखेडराजा तालुक्यातील ७९८५, देऊळगाव राजा ७६१०, लोणार मधील ७६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये तूर, कपाशी, ज्वारी, भाजीपाला, फळबागांचा समावेश आहे.

हेही वाचा… उपराजधानी ओलिचिंब! जनजीवन विस्कळीत; नागपूर शहरालगत गारपीट

दुसरीकडे सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील १००६ भाजीपाला बीजोत्पादन करणारया शेडनेटची नासाडी झाली आहे. जिल्ह्यात ५२ घरांची अंशतः पडझड झाली असल्याचे अहवालात नमूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loss of crops on 34 thousand hectares heavy damage to shed net and 52 houses collapsed in buldhana due to unseasonal rain scm 61 dvr