नागपूर : मनोरुग्ण आईने तिच्या मुलांना तब्बल तीन वर्षे डांबून ठेवले होते. ही घटना उघडकीस येताच पोलिसांच्या सहकार्याने बाल संरक्षण पथकाने केली कार्यवाही केली व मुलांची सुटका केली. २४ ऑगस्टला तीन वर्षांपासून शाळेत न गेलेल्या आणि घराच्या अंगणातदेखील न फिरलेल्या दोन बालकांची यशस्वी सुटका करण्यात आली. ही कारवाई बाल संरक्षण पथक व ग्रामीण मुक्ति ट्रस्टच्या पुढाकाराने समन्वयातून पार पडली. २० ऑगस्ट ला ही घटना उघडकीस आली.
जिल्हा कार्यालयाकडून नागपूर जिल्ह्याच्या गावागावांमध्ये मुलांच्या सुरक्षा संबंधी स्थापित करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीची सभा घेण्यात आली. ग्राम बाल संरक्षण समितीची बैठकित यावेळी गावातील दोन मुले गेली तीन वर्षे शाळेत न जाता त्यांना घरातच डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शेजाऱ्यांनीही मुलांना दोन ते तीन वर्षांपासून न पाहिल्याचे सांगितले. यावर समितीने तातडीने निर्णय घेत गृहभेट घेतली.
मुलांची आई मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे आढळले. त्यामुळे २१ ऑगस्टला प्रकरण नोंदवण्यात आले व याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना देण्यात आली. पठाण यांनी सदर प्रकरण हे संवेदनशील असल्याने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांना सांगितले. त्यांनी तातडीने पथक गठीत करून मुलांची सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच याबाबतचे पत्र पोलिस निरीक्षक व बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले. सर्व औपचारिकता पूर्ण करून २२ ऑगस्टला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार पोलिसांच्या सहकार्याने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुलांच्या आईला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कुटुंबाला समुपदेशनही देण्यात आले. सुटका करण्यात आलेला दोन्ही मुलांचे वय सहा वर्ष व सात वर्षे असल्याने तसेच मुले सुटका केल्यानंतर थोडीशी विचलित वागत असल्याने बालगृहातत त्याच मुलांचा समुपदेशन सुरू असून मुलांना सायकॉलॉजिस्टकडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व सदर मुलांच्या बाबतीत नातेवाईकांची व इतर आप्त परिवारांची गृह चौकशी करण्यात येणार आहेत.
सदर कार्यवाहीत चाईल्ड प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे,ग्रामीण समस्या मुक्ति ट्रस्टच्या कोऑर्डिनेटर शायना शेख, अश्विनी चौरे, सामाजिक कार्यकर्ता वर्षा पाटील, न्यु व्हिजन फाऊंडेशन अध्यक्षा प्रियंका होटे, वाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी ग्राम बाल संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले या यशस्वी मोहिमेमुळे तीन वर्षांपासून अंधारात कैद असलेली दोन निरागस मुले अखेर सुरक्षिततेकडे आली आहेत. कोणती मुले अडचणीत असेल किंवा आई वडील, नातेवाईकाकडून, किंवा इतर व्यक्ती यांच्याकडून कुरुरता झाली असेल, तर १०९८ चाईल्ड हेल्पलाईनवर फोन करा तातडीने कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले.