scorecardresearch

महाराष्ट्र पोलिस

महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करते. राज्याच्या गृह मंत्रायलामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा समावेश होतो. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक आहे. यामध्ये एकूण १२ पोलीस आयुक्तालये आणि २३ जिल्हा पोलीस घटक आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि वसई विरार या दोन आयुक्तालयांचादेखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये २ लाखांपर्यंतचे मनुष्यबळ आहे. मुंबईमध्ये या दलाचे मुख्यालय आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाते. शिपाई तसेच अन्य पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ठराविक कालावधीनंतर राबवण्यात येते. या संबंधित माहिती पोलीस दलाद्वारे प्रसिद्ध केली जाते. रजनीश सेठ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक विभाग आहेत. मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य असताना पहिल्यांदा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढे या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. तेव्हा बॉम्बे प्रांतासाठी बॉम्बे पोलीस दल कार्यरत होते. पुढे १९४७ नंतर बॉम्बे प्रांताचे विभाजन होत राज्यांची निर्मिती होत गेली. तेव्हा बॉम्बे पोलीस दल महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस आणि म्हैसूर पोलीस (कर्नाटक पोलीस) या तीन दलांमध्ये विभागले गेले. महाराष्ट्र पोलीस खात्यामधील मुंबई पोलीस दल हे स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे असे मानले जाते. Read More
Lost intellectually-challenged boy reunited with parents via QR code on pendant
खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध

८ तासात सापडला हरवलेला दिव्यांग मुलगा! गळ्यातल्या QR code पेंडेंटमुळे पोलिसांना मिळाला पालकांचा पत्ता

Kerala Student Death Case
केरळमधील जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरण; पोलीस अहवालात धक्कादायक माहिती समोर, तब्बल २९ तास मानसिक छळ अन्…

केरळमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये विद्यार्थी जेएस सिद्धार्थन याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेचा अहवाल समोर आला…

Failed Robbery Attempt
माय-लेकींच्या धाडसाला सलाम! दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांशी भिडल्या; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून आरोपींना अटक

दरोडा टाकण्यासाठी घरात शिरलेल्या चोरांना माय-लेकींनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याची घटना हैदराबाद शहरात घडली.

Gangster Prasad Pujari arrested
२० वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

गॅंगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी चीनमधून अटक केली. गॅंगस्टर प्रसाद पुजारी हा २० वर्षांपासून फरार होता.

Rajasthan police arrested to Pakistani spy
लष्कराचे गणवेश विकणारा निघाला पाकिस्तानचा गुप्तहेर; राजस्थानमधील व्यक्ती हनीट्रॅपच्या जाळ्यात

लष्कराचे गणवेश विकणाऱ्या एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून हा व्यक्ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे.

Telangana Police trained a eagles
धोकादायक ‘ड्रोन’ पाडण्याचे ‘गरुड’ पक्षाला प्रशिक्षण, तेलंगणा पोलिसांचा यशस्वी प्रयोग

तेलंगणा पोलिसांकडून गरुड पक्षाला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे? यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून याची यशस्वी चाचणीदेखील करण्यात आली.

nashik rural police get 20 new four wheelers in presence of guardian minister dada bhuse
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात नव्याने २० चारचाकी वाहनांचा समावेश

ग्रामीण पोलिसांच्या मागण्या लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली.

cm eknath shinde inaugurated 34th state level police sports competition in nashik
नाशिक : पोलिसांना सुविधा देण्यास सरकार कटीबध्द – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पोलीस महासंचालक शुक्ला यांनी, पोलीस क्रीडा स्पर्धांची माहिती दिली. याआधी नाशिकमध्ये दोन वेळा या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आहेत.

62 cops in maharashtra police force get president medal on eve of republic day
सहपोलीस आयुक्तांसह निकेत कौशिक, मधुकर पांडे, दिलीप सावंत यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके

महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके जाहीर झाली असून राज्यातील १८ पोलिस जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

ips rashmi shukla latest news in marathi, rashmi shukla appointed as director general of police of maharashtra
विश्लेषण : रश्मी शुक्ला अखेर पोलीस महासंचालक… पण त्यांची नियुक्ती इतकी चर्चेत कशासाठी? प्रीमियम स्टोरी

राजकारण्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या शुक्ला यांची नियुक्ती सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. असे का, याचा हा आढावा…

संबंधित बातम्या