Premium

नागपूर: वनहक्कधारकांच्या हक्कांसाठी आमदार उपोषणावर !!

जंगलावर उपजिविका असणाऱ्या आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांना सामूहीक वनहक्क व वनातील गौणउपजावर स्वामीत्त्व हक्क असतानाही गोंदिया वनखात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हक्कावर गदा आणली.

MLA Sahasram Korote on hunger strike for rights of forest rights holders
(वनहक्कधारकांच्या हक्कांसाठी आमदार सहसराम कोरोटे यांनी आजपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला)

नागपूर : जंगलावर उपजिविका असणाऱ्या आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांना सामूहीक वनहक्क व वनातील गौणउपजावर स्वामीत्त्व हक्क असतानाही गोंदिया वनखात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हक्कावर गदा आणली.याविराेधात गेल्या सहा दिवसांपासून वनहक्कधारक आमरण उपोषणाला बसले. मात्र, वनखात्याला जाग आली नाही आणि अखेर आता आमदार सहसराम कोरोटे यांनी आजपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
जंगलालगतच्या गावकऱ्यांवर झालेले अन्याय कबुल करत शासनाने वनहक्क कायद्यानुसार त्यांना त्यांचे अधिकार दिले. मात्र, वनखाते आणि खात्यातील अधिकारी अजूनही त्याच इंग्रजाळलेल्या मानसिकतेत वावरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैसुली ग्रामसभेस सामुहिक वन हक्क प्राप्त असताना सुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेने जमा केलेली तेंदूपाने जप्त केली. अवैधरीत्या जप्त केलेली तेंदुपाने त्वरीत नुकसान भरपाईसह ग्रामसभेच्या स्वाधिन करावे. तसेच पोलीस तक्रार अर्जानुसार संबंधित वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर त्वरीत अनुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करुन आम्हा वनहक्कधारकांना न्याय द्यावा या मागणीसाठी वनहक्कधारकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. लोकावनहक्क धारकांच्या आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी नारायन सलामे, संतोष भोयर, जैराम केरामी या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>>‘प्लास्टिक’च्या भस्मासुरामुळे अकोल्याचे पर्यावरण धोक्यात

उपोषणाच्या सहाव्या दिवशी आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मंगळवारपासुन उपोषणावर बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 11:24 IST
Next Story
भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा १४ ला अकोल्यात; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी