नागपूर: सोन्याचे दर मध्यंतरी २४ कॅरेटमध्ये एक लाखाहून अधिकवर गेले होते. त्यानंतर दर काही प्रमाणात कमी झाले. दरम्यान सोन्याचे दर मागील तीन दिवसांत घसरले आहे. सराफा बाजारात गुरूवारी (१७ जुलै २०२५ रोजी) काय होते, याबाबत आपण जाणून घेऊ या.

सोन्याचे दर एक लाखावर पोहचल्यावर प्रथमच घसरून मंगळवारी (२४ जून २०२५) निच्चांकीवर आले आहे. मागील २४ तासात सोन्याचे दर चांगलेच घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे वाढते दर ग्राहकांची चिंता वाढवत होते. त्यामुळे ग्राहकांकडून दागिने खरेदी दरम्यान आवश्यकतेनुसार खूप कमी वजनाच्या दागिन्यांनाच प्राधान्य दिले जात होते. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यावर ग्राहकांकडून हे दर कमी कधी होणार? हा प्रश्न सराफा व्यवसायिकांना विचारला जात होता. तर सराफा व्यवसायिक दर आणखी वाढण्याचे संकेत देत होते. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याच्या दराने २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात १४ जुलै २०२५ रोजी पावसाळ्याच्या दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार रुपये नोंदवले गेले. हे दर १७ जूनला दुपारी २.३० वाजता प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९७ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ४०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात सोन्याच्या दरात १४ जुलैच्या तुलनेत १७ जुलैला दुपारी २.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति १० ग्राम ९०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ८०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ७०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ६०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो १४ जुलैला १ लाख १४ हजार ७०० रुपये होते. हे दर १७ जुलैला दुपारी २.३० वाजता प्रति किलो १ लाख ११ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात १४ जुलैच्या तुलनेत १७ जुलैला दुपारी २.३० वाजता ३ हजार ३०० रुपये प्रति किलोने घट झालेली दिसत आहे.