नागपूर :ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर येथे तिरंगा यात्रेचे आयोजन माजी सैनिकांनी केले होते. रविवारला इतवारी शाहिद चौक ते महाल येथील पंडित बछराज व्यास चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके ,संदीप जोशी, भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी सहभागी झाले.यावेळी नागपूर तिरंगामय झाल्याचे चित्र दिसत होते.’भारत माता की जय’ च्या निनादात येथील भव्य तिरंगा यात्रेत हजारो नागरिक तसेच भाजपा व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सामील झाले होते.

“पाकिस्तानने पहेलगाम येथे जो भ्याड हल्ला केला त्यावर भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्याचे शौर्य हे वाखाणण्यासारखे असून जगातील सर्वोत्कृष्ट असलेल्या भारतीय सैन्य दलामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे, आपण सर्व सुरक्षित आहोत, असे यावेळी सांगण्यात आले. तिरंगा यात्रेत नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खापरखेडा येथील यात्रेत सहभागी

खापरखेडा येथे आमदार आशीष देशमुख यांनी आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.”पाकिस्तानने पहेलगाम येथे जो भ्याड हल्ला केला त्यावर भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्याचे शौर्य हे वाखाणण्यासारखे असून जगातील सर्वोत्कृष्ट असलेल्या भारतीय सैन्य दलामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे, आपण सर्व सुरक्षित आहोत. आजच्या या तिरंगा यात्रेत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यात राष्ट्रभावना प्रकर्षाने दिसली”, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी केले.

महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले. भारतीय सैन्यदलाप्रति त्यांनी आदराची भावना व्यक्त केली. आपला देश सुरक्षित हातात असून कुठल्याही अतिरेकी हल्ल्याला किंवा पाकिस्तानच्या सैनिकांना उत्तर देण्यास आपले भारतीय सैन्यदल समर्थ आहे, असे ते म्हणाले.

डॉ आशिषराव देशमुख प्रास्ताविक करताना म्हणाले, “भारत-पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तान नामोहरम झाला. भारतीय लष्कराच्या पाठीशी नागपूर जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी आहे. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. या तिरंगा यात्रेत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. खापरखेडा येथे या यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे, त्यातून भारतीय सैन्य दलाबद्दल असलेला विश्वास प्रामुख्याने दिसून येतो. भारतीय लष्कराला सलाम..”