नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधकांनी दिल्लीवारी केल्यानंतर आता पटोले समर्थकही दिल्लीत धडकले असून, त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. हेही वाचा - भाजपाने जाहीर केले लोकसभा निवडणूक प्रमुख, आमदार दटकेंकडे नागपूरची जबाबदारी काँग्रेसला गटबाजी नवी नाही. पक्ष सत्तेत असो किंवा नसो कायम पक्षाअंर्गत धूसफूस सुरू असते. प्रत्येक नेता पक्षातील वर्चस्व टिकवण्यासाठी धडपडत असतो. विरोधक दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करीत असतात. याच मालिकेत अलीकडेच माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे या माजी मंत्र्यांनी दिल्लीत जावून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून दूर करण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. याला शह देण्यासाठी पटोले यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने दिल्ली गाठली. तेथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.