नागपूर: शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या बारावी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आरोग्य विभागांमध्ये १९७४ जागांवर आरोग्य अधिकारी पदाची भरती होणार आहे. या पदासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया परीक्षा पद्धती आणि परीक्षेचे शुल्क खाली सविस्तर देण्यात आलेली आहे. तेव्हा कसलीही वाटण पाहता त्वरित अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.
समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) रिक्त पदांची भरती करीता प्रस्तृत जाहीरातीत नमुद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) भरावयाचे रिक्त पदाकरीता उमेदवारांनी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विविध मुदतीत अर्ज सादर करावे, ऑनलाईन भरलेल्या अर्जा व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
येथे करता येईल नोंदणी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या पदाची पदभरती करण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत. (अर्जाकरीता लिक नोटीफिकेशन द्वारे https://nhm.maharashtra.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात येईल, सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करुन घ्यावयाची जबाबदारी उमेदवाराची राहील.
जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. मकसी १०००७/प्र.क्र.३६/का.३६ दिनांक १० जुलै २००८ अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवार पदांसाठी अर्ज करू शकतात.
परीक्षेची माहिती लक्षात घ्या
१ . ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंकबाबत अर्जाकरीता लिंक व अर्ज सादर करण्याचा
तपशिल नोटीफिकेशन द्वारे https://nhm.maharashtra.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात येईल.
परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेश पत्र हे परीक्षेपुर्वी ७ दिवस आधी उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यासंबंधीची लिंक नोटीफिकेशनद्वारे द्वारे https://nhm.maharashtra.gov.in वर कळविण्यात येईल.
२. परीक्षा शुल्क –
२.१. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. १०००/-
२.२. मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. ९००/-
२.३. अनाथ उमेदवारांसाठी रू.९००/-
२.४. माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील,
२.५. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.
२.६. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनामी (पावती) प्रत्त ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रती सोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
३. अर्ज भरणे व सादर करणे बाबत आवश्यक सूचना-
३.१. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://nhm.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी.
३.२. अर्जात हेतू पुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट दाखले सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेचे वेळी नक्कल (copy) करणे, वशीला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहेर अथवा परीक्षे नंतर ही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडींना अपात्र ठरविणे इत्यादी यापैकी प्रकरण परत्वे योग्य त्या शिक्षा करणेचा तसेच प्रबलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्यती कारवाई करणेचे अधिकार मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांना राहतील. तसेच विहीत केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. तसेच निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल.
३.३. गयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक (एस.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरणेत येईल.
३.४. शैक्षणिक अर्हते संदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हताधारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्याआधारे उमेदवाराथी पात्रता ठरविणेत येईल.
