माता वैष्णोदेवीचे दर्शन करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे ते सर्वांना शक्य होत नाही. हातावर आणून पानावर खाणाऱ्या महिलांसाठी तर हे दिवास्वप्नच. मात्र, चंद्रपुरातील रोटरी क्लबचे सदस्य नितीन व भारती गुंदेचा यांनी मोलमजुरी, धुणीभांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तब्बल १०२ महिलांचे हे स्वप्न पूर्ण करीत त्यांना वैष्णोदेवीचे दर्शन घडवून आणले. त्यांचे रेल्वेने जाणे येणे, सहा दिवसांचे जेवण, रात्रीचा मुक्काम, ही सर्व सोय गुंदेचा कुटुंबीयांनी केली. यामुळे महिला भारावून गेल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- वर्धेतील लालनाला जलाशयावर ‘फ्लेमिंगो, क्रेन’चे आगमन; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

जम्मू काश्मिरातील त्रिकूट पर्वतावर माता वैष्णोदेवीचे भव्य मंदिर आहे. वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक जण कुटुंबीयांसोबत देवीच्या दर्शनाला जातात. मात्र, आर्थिक परिरस्थितीअभावी अनेकांना वैष्णोदेवीचे दर्शन घेता येत नाही. चंद्रपुरातील नितीन व भारती गुंदेचा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मोजमजुरी, धुणीभांडी करणाऱ्या, हातावर आणून पानावर खाणाऱ्या तब्बल १०२ महिलांना वैष्णोदेवीचे दर्शन घडवून आणले. योनका येथे रोटरीद्वारे सर्व महिलांची मोफत शारीरिक तपासणी करण्यात आली. वैष्णोदेवीचा गड चढण्यासाठी १५ महिला असमर्थ ठरल्या. त्यांना थांबण्याची व्यवस्था केल्यानंतर इतर महिलांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महिलांनी गडावर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवबाबांची यात्रा पूर्ण करून अर्धकुमारी गुहेचे दर्शन घेतले. वैष्णोदेवी व भैरवबाबांचे दर्शन करून महिला भारावून गेल्या. आपण जणू स्वप्नातच आहोत की काय, असे त्यांना वाटत होते.

हेही वाचा- उडत्या विमानातून धूर; नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

दर्शनानंतर सर्व महिला रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागल्या. भद्रावती रेल्वेस्थानकात दाखल होताच रोटरीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, सुनिता जयस्वाल यांनी सर्वांना फळे, थंड पेये, मिष्ठान्न वाटप केले. नितीन व भारती गुंदेचा यांचे स्वागत व अभिनंदन केले. महिलांच्या यात्रेच्या नियोजनासाठी रोहित गुंदेचा, विठ्ठल झाडे, आजोबा उके, शीतल, राधिका सचदेवा, समीक्षा, अनु सोमनाथ, रितू वर्मा यांनी परिश्रम घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin and bharti gundecha members of the rotary club brought 102 domestic workers women in chandrapur to visit vaishno devi rsj 74 dpj