नागपूर : शेतकऱ्याच्या प्रश्नावरुन विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसाचे हित पाहत असताना संकटकाळात विविध योजना जाहीर करत त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे, मात्र विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्यामुळे ते आता कांद्यावर राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते. कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काद्याची निर्यात बंदी हटविण्याची मागणी केंद्र सरकारकडे वारंवार करत होतो त्यामुळे केंद्र सरकारने ती मान्य केली आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून विरोधक मात्र शेतकऱ्यासाठी काही न करता त्यांच्या नावावर केवळ राजकारण करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा – नागपूर : सुरक्षारक्षकाकडून रायफल लोड करताना गोळी सुटली, एटीएमची काच फुटली

हेही वाचा – गोंदियात रासायनिक पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही

मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी, आम्ही तिघेजण केंद्र सरकारच्या पाठीमागे यासाठी लागून होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब आम्ही केंद्र सरकारला कळवली होती. त्याला आता प्रतिसाद मिळाला. देशात कांद्याची कमतरता झाली तर बाहेरच्या देशातून आयात करावा लागतो. मात्र आता निर्यात बंदी हटविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics on onion now as opposition has no issue comments devendra fadnavis vmb 67 ssb